आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज!!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाच्या बैलजोडीसह खासदार सुप्रिया सुळे... - Divya Marathi
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाच्या बैलजोडीसह खासदार सुप्रिया सुळे...
संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडमधून पाटसमध्ये पोहचली आहे. तेथे आज सकाळी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांसोबत वारीत चालतांना अतिशय छान वाटत होते. दरवर्षी वारीत चालतांना मानसिक समाधान मिळते ते नक्कीच ऊर्जादायी असते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या वारीत सुरेखा जगताप या अंगणवाडीत आशाताई म्हणून काम करणा-या महिलेसोबत फुगडीही खेळल्याचे त्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे वाल्हे, पुरंदर येथे दर्शन घेतले. बारामती मतदारसंघातून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जात असते. पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसोबत संवाद साधतांना मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळत असते. वारी सोबत चालतांना तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या, संपूर्ण पालखीला स्वयंपाक करून प्रेमाने जेवू घालणाऱ्या महिला यांच्यासोबत गप्पा मारतांना अतिशय छान वाटले. अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने त्या सगळ्यांची काळजी घेत होत्या, असे सांगत त्यांनी त्यांच्यासमवेतचे फोटो शेअर केले आहेत.
पाहा, सुप्रिया सुळेंनी पालखीत कसा आनंद लुटला...
बातम्या आणखी आहेत...