आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Suresh Kalmadi Funally Supports To Vishwajeet Kadam

खासदार सुरेश कलमाडींचा अखेर विश्वजित कदमांना पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बहुचर्चित पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले खासदार सुरेश कलमाडी यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आल्याचे दिसत आहे. सुरेश कलमाडी यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदमांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पुण्याच्या विकासासाठी कदम प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असे वाटत असल्याने आपण त्यांना पाठिंबा जाहीर करीत असल्याचे कलमाडींनी आज सांगितले. कलमाडी यांनी मागील आठवड्यात आपल्या समर्थकांना 'कलमाडी हाऊस'वर बोलावले होते. तसेच त्याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. कलमाडी सध्या काँग्रेसमधून निलंबित आहेत. त्यामुळे समर्थकांची मोठी गोची झाली होती. अखेर समर्थकांनीच थोडे धीराने घेण्याचे सांगत सध्या कदम यांना पाठिंबा देणेच योग्य ठरेल असे कलमाडींना सांगितले होते. अखेर कलमाडींनी विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, याआधी पडद्यामागे काही घडामोडी घडल्या असण्याची शक्यता आहे. काँग्रेसने कलमाडींचे निलंबन रद्द करण्याचे आश्वासन दिले असण्याची शक्यता आहे. तसेच पुणे काँग्रेसवर संघटना पातळीवर आपलेच वर्चस्व राहील याचा शब्द घेतला असण्याची शक्यता आहे.
कदम यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरेश कलमाडी यांचे गुरुवारी लोहगाव विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले. या स्वागतानंतर समर्थकांनी कलमाडींची उघड्या जिप्सी जीपमधून मिरवणूक काढली. त्यावेळी पत्रकारांनी लोकसभा लढविणार का असे प्रश्न विचारले होते. मात्र, कलमाडी यांनी गोल-गोल उत्तरे देत समर्थकांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. काँग्रेसने कदम यांना उमेदवारी दिल्याने कलमाडी नाराज झाले होतेच पण पक्षाने आपले मतही विचारात घेतले नसल्याने ती भलतेच दुखावले होते. त्यामुळेच आपली ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी कलमाडींनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. यामुळे कलमाडी बंडखोरी करणार काय याकडे लक्ष लागले होते.
पुढे वाचा, कलमाडींनी का पाठिंबा दिला कदमांना...