आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrunal Kulkarni Directed First Marathi Film Prem Mhanje..

मृणाल कुलकर्णी म्हणते,‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - काळानुरूप बदलत चाललेनी लग्नसंस्था, प्रेमाचे नवे रंग, कौटुंबिक जबाबदार्‍यांची जाणीव आणि मानवी नातेसंबंधांची एक मजेदार गुंफण ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या माझ्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येईल. तसेच नात्यांकडे पाहण्याचा एक खेळकर दृष्टिकोन मिळेल, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने‘दिव्य मराठी’शी बोलताना येथे मांडले. मृणालने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट 19 एप्रिलपासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने तिने दिव्य मराठीशी संवाद साधला.
वर्षानुवर्षे एकमेकांसह राहणार्‍या, संसाराचा खेळ मांडणार्‍या बहुतेकांना प्रेमभावनेची जाणीवच नसते, असा अनुभव येतो. शिवाय प्रेम हे फक्त स्त्री-पुरुष यांच्यातील जोडीदाराच्या नात्यापुरतेच मर्यादित नसते. प्रत्येक नात्याला प्रेमाची तहान असली तरच ते फुलते. विकसित होते. प्रेम जबाबदारी ओळखायला आणि निभावायला शिकवते. प्रेम वयाच्या कुठल्याही टप्प्यावर भेटू शकते आणि व्यक्तीनुसार या प्रेमाच्या तºहा वा रंग निरनिराळे असू शकतात, हे सांगण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून दिग्दर्शक या नात्याने केला आहे, असे मृणाल म्हणाली. चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व या चित्रपटात आहे आणि त्या प्रत्येक पिढीचा प्रेमाकडे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, असे सांगून मृणाल म्हणाली, बदलत जाणार्‍या विवाहसंस्थेकडे नव्याने पाहण्याचा प्रेमळ दृष्टिकोन हा चित्रपट देतो.
सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, सुनील बर्वे, डॉ. मोहन आगाशे, स्मिता तळवलकर, नेहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, रसिका वझे असे उत्तम कलाकार मला माझ्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नांत मिळाल्याने माझे काम खूपच सोपे झाले. माझ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच प्रतिसाद देतील, असा विश्वासही तिने या वेळी व्यक्त केला.

नाती जोपासावीच लागतात
कुठलेही नाते नुसते सांगून टिकत नाही. नाते टिकवण्यासाठी ते प्रयत्नपूर्वक जोपासावे लागते. पती - पत्नी हे असे एकमेव नाते असते, जे रक्ताचे नसते, पण ते रक्ताची नाती निर्माण करते. अशा नात्यांच्या जोपासनेविषयी माझा चित्रपट काही सांगू पाहतो.