आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SSC RESULT पाहण्यासाठी येथे क्लिक करा, राज्याचा 91% निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य शिक्षण मंडळाने मार्च 2015 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी हा निकाल जाहीर केला. यंदा दहावीचा राज्याचा निकाल 91.46 टक्के लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकणच्या विद्यार्थ्यांनी बारावीप्रमाणेच दहावीत बाजी मारली असून कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकणचा विभागीय निकालाची टक्केवारी तब्बल 96.54 टक्के इतकी आहे. त्याखालोखाल कोल्हापूर, पुण्याने क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरचा 95.12 तर पुणे विभागाचा 95.10 टक्के निकाल लागला आहे. लातूर विभागाचा सर्वाधिक कमी निकाल लागला आहे. 92.94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा राज्यातील 17 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
विभागवार निकालाची टक्केवारी-
मुंबई - 92.90 टक्के
कोकण - 96.54 टक्के
पुणे - 95.10 टक्के
कोल्हापूर- 95.12 टक्के
औरंगबाद- 90.57 टक्के
नागपूर- 87.01 टक्के
लातूर- 86.38 टक्के
नाशिक- 92.16 टक्के
अमरावती- 86.84 टक्के
मंडळाच्या संकेतस्थळांवर तुम्ही निकाल पाहू शकाल. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व या माहितीची प्रिंट घेता येईल.
मंडळाची संकेतस्थळे -
SMS वरही निकाल -
एसएमएस करून मोबाइलवरही निकाल मिळेल. त्यासाठी... MH10 आसन क्रमांक टाइप करून 58888111 वर पाठवावा.
राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट - https://mahahsscboard.maharashtra.gov.in
बातम्या आणखी आहेत...