आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय नको म्हणून भोर एसटी आगारातून 8 बस सोडल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून भोर एसटी आगारातून 8 बस सोडण्यात आल्या आहेत. सेवा सुरू झाली असली तरी राज्यात सुरु असणाऱ्या संपाला पाठिंबा कायम असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. 
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस आणि मालवाहू वाहने अशी 635 वाहने ताब्यात घेऊन त्यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) मैदानात करण्यात आली असून, ‘एसटी’च्या तिकिटाएवढेच भाडे आकारण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...