आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mughal Subhedar Nizam Surrenders Before Bajirao Peshwa Twice

भारताचा सिकंदर, सह्याद्रीचा वीर बाजीरावने आजच सोडले होते प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर मराठा साम्राज्यात नावे येते ते बाजीरावाचे. आपल्या अतुलनीय पराक्रमाने त्याने मराठी साम्राज्याचा विस्तार केला. मोगली पाशातून भारतातील जनतेला मुक्त केले. अशा या सह्याद्रीच्या वीराचा मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी इंदूरजवळ असलेल्या खारगावला झाला. नर्मदेच्या तिरावर असलेल्या रावेरखेडी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूसह मराठा साम्राज्यातील एक वादळ शमले. पण त्या प्रेरणेतून अनेक मराठी वीर जन्मायला घातले.
2 एप्रिल 1720 रोजी बाळाजींचा मृत्यू झाल्यावर 19 वर्षांच्या बाजीरावाला 17 एप्रिल 1720 रोजी शाहुने कऱ्हाडजवळ असलेल्या मसूर येथे पेशवेपदाची वस्त्रे दिली. त्याला श्रीपतराव प्रतिनिधी, आनंद सुमंत, नारोराम मंत्री, सेनापती खंडेराव दाभाडे, कान्होजी भोसले आदी सरदारांचा कडाडून विरोध होता. पण बाळाजीबद्दल असलेली कृतज्ञतेची भावना आणि बाजीरावाच्या कर्तुत्वाविषयी असलेल्या विश्वासाने विरोध झुकारुन शाहुने हा निर्णय घेतला होता.
बाजीराव बाळाजींचा थोरला मुलगा होता. त्याचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झाला होता. तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा धनी होता. राजकारणातील खाचाखोचा त्याला उत्तम समजायच्या. वडीलांसोबत दिल्ली दौरा केला असल्याने उत्तरेकडील राजकारण आणि दिल्ली दरबाराची पुरेपुर माहिती होती. रणांगणांवर पराक्रम गाजवण्यासाठी आवश्यक असलेले शौर्य, साहस, करारीपणा हे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वात होते. महत्त्वाकांक्षा हा त्याचा स्वभावगुणधर्म असल्याने अतिशय चपळाईने आणि आक्रामक धोरण स्विकारुन त्याने पुढील काळात राज्याचा विस्तार केला.
मराठा राज्यातील ज्येष्ठ सरदारांचा विरोध असल्याने त्याने राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघुजी भोसले, पुरंदरे, हिंगणे, पवार आदी तरुण दमाचे सरकारी सोबत घेतले. बाजीरावाला केवळ 20 वर्षांची कारकिर्द लाभली. पण त्यात त्याने अचाट पराक्रम करुन दाखवला. अवघ्या महाराष्ट्रात मराठेशाहीचा भगवा नाचवला आणि दिल्लीला हादरवून सोडले. त्यामुळेच शिवाजी महाराजानंतर कुणाचे नाव घेतले जाते तर ते आहे पेशवा बाजीराव याचे.
पुढील स्लाईडवर वाचा, पालखेड आणि भोपाळजवळ बाजीरावाने कसे कोंडीत पकडले बलाढ्य निझामाला... निझाम होता बादशहाच्या वजीर... त्याचा नशा कसा उतरवला... अगदी नाक पकडून दोनदा तो मराठ्यांना शरण आला होता....विशेष म्हणजे युद्धही न करता....
(सौजन्य- मराठ्यांचा इतिहास, लेखक- प्रा. मदन मार्डीकर)