आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संविधानाच्या जागरासाठी पुण्यात मूकमाेर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संविधान दिनाचे औचित्य साधून बहुजन समाजातील विविध संघटना व कार्यकर्त्यांनी आपल्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रविवारी पुण्यात काढलेल्या संविधान सन्मान मूकमाेर्चाला लक्षावधी बहुजनांनी उपस्थिती लावली. महिला आणि विद्यार्थिनींच्या नेतृत्वाखाली हा माेर्चा काढण्यात अाला. मुलींच्याच हस्ते निवेदन प्रशासनाला देण्यात अाले.

बहुजन समाजगटांचे मूलभूत प्रश्न संविधानाच्या चौकटीत सुटावेत यासाठी संविधानाचा जागर, सन्मान करण्याच्या उद्देशाने या माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी आयोजन समितीने आचारसंहिताही तयार केली होती. सकाळी ११ वाजता निर्धारित वेळ हाेती, मात्र शहराच्या चहुबाजूंनी लाेक येत असल्यामुळे सुमारे साडेबाराच्या सुमारास माेर्चाला प्रारंभ झाला. डेक्कन चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माेर्चाची सुरुवात करण्यात अाली. निळे झेंडे, घोषणा लिहिलेले फलक हाती घेतलेल्या महिलांनी आणि विद्यार्थिनींनी माेर्चाची अाघाडी सांभाळली होती. आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, दीप्ती चौधरी, रिपाइंचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर, सुधीर जानजोत, मिलिंद अहिरे अादी विविध पक्षांची राजकीय नेतेमंडळीही सहभागी झाली हाेती. दरम्यान, या माेर्चात सुमारे १५ लाखांहून अधिक लाेक सहभागी झाल्याचा दावा अायाेजक करत अाहेत, तर पाेलिसांच्या मते गर्दी कमाल दीड लाखांवर हाेती.

अामचा संघर्ष संविधानासाठी : ना जातीसाठी, ना मातीसाठी, आमचा संघर्ष संविधानासाठी, घरकामगार व अन्य सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, इंदू मिल येथे डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम त्वरित चालू करा, अॅट्रॉसिटीच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना करा.. अशा घोषणा लिहिलेले फलक हातात धरून विद्यार्थी, महिला व युवक मूकमाेर्चात चालत होते. साडेचारच्या सुमारास माेर्चा कौन्सिल हॉलवर पाेहाेचला. तेथे १३ समाजसमूहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ विद्यार्थिनींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
बातम्या आणखी आहेत...