आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Allows IPL Match In Pune On May 1

IPL: 1 मे रोजीचा पुणे- मुंबई संघातील सामना पुण्यातच होणार, कोर्टाची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 मे रोजी पुण्यात होणा-या मुंबई व पुणे संघातील सामन्याला मुंबई हायकोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. - Divya Marathi
1 मे रोजी पुण्यात होणा-या मुंबई व पुणे संघातील सामन्याला मुंबई हायकोर्टाने अखेर परवानगी दिली आहे.
मुंबई- 30 एप्रिलनंतरचे आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर हालवा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर 1 मे रोजी पुण्यात मुंबई व पुणे संघात होणा-या सामन्याला अखेर परवानगी दिली आहे. 1 मे रोजीचा सामना विशाखापट्टणम ऐवजी पुण्यातच व्हावा अशा मागणीची याचिका बीसीसीआयने कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
1 मे रोजी मुंबई व पुणे संघादरम्यान पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सामना होणार होता. मात्र, कोर्टाच्या आदेशाने त्यावर बंधन आले. मात्र, 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता याच मैदानावर पुणे आणि गुजरात लायन्स संघात सामना होणार आहे. त्यामुळे पुण्याने निश्चित केलेल्या विशाखापट्टणम येथे 24 तासात पोहचणे व तेथील इतर व्यवस्था करणे शक्य नसल्याचे मुंबई हायकोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आले. तसेच 1 मे रोजीचा सामना पुण्यातच होऊ द्यावा अशी विनंती बीसीसीआयचे वकिल रफिक दादा यांनी कोर्टाकडे केली.
न्यायाधिश व्ही.एम. कानडे आणि न्यायाधिश एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करीत पुणे संघाला बोर्डिंग आणि इतर तयारीसाठी कमी वेळ मिळत असल्याचे मान्य करीत 1 मे रोजीचा सामना पुण्यात खेळण्यास परवानगी दिली. बीसीसीआयने 16 एप्रिल रोजी कोर्टात धाव घेतली होती. 13 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टाने राज्यातील भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई पाहता 1 मे नंतरचे राज्यातील सर्व आयपीएलचे सर्व सामने इतरत्र हलविण्यास सांगितले होते. तसेच याची तयारी करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देत आहोत असे निर्देश दिले होते.