आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Stays Capital Punishment Of Santosh Mane

9 जणांना चिरडणा-या संतोष मानेची फाशी रद्द, उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्‍यात स्वारगेट बस स्‍थानकातून बस पळवून भररस्त्यावर बेदरकारपणे चालवून 9 जणांना चिरडणा-या संतोष मानेची फाशीची शिक्षा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने रद्द केली आहे. सत्र न्‍यायालयाने पुन्‍हा निर्णय द्यावा, असे निर्देश न्‍यायालयाने दिले आहेत. त्‍यामुळे मानेला तात्‍पुरता दिलासा दिला आहे.

सत्र न्‍यायालयाने काही महिन्‍यांपूर्वी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु, मानेच्‍या वकिलांनी एका तांत्रिक बाजूवरुन उच्‍च न्‍यायालयात बाजू मांडली. मानेला शिक्षा ठोठावताना, 'तुला शिक्षा मान्य आहे का असे विचारले आणि तुझ्या कुटुंबावर काय वेळ येईल हे तुला माहित आहे का असे विचारले', अशी विचारणा केली नसल्‍याचे निदर्शनास आणून देण्‍यात आले. ही बाब मान्‍य करुन उच्‍च न्‍यायालयाने मानेची फाशी रद्द केली. सत्र न्‍यायालयाने या सर्व बाबींचा विचार करुन पुन्‍हा निर्णय द्यावा, असे निर्देश दिले.

काय घडले होते त्‍या दिवशी.. वाचा पुढील स्लाईडवर...