आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्से टोलनाक्यावरील विचित्र अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेल-वे मार्गावर झालेल्या चार-पाच वाहनांच्या विचित्र अपघातातील एका जखमींचा आज उपचारादरम्यान चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अक्षय चौगुले (41, बाणेर, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
रविवारी चार-पाच कार गाड्या एकमेंकावर धडकत 12 जण जखमी झाले होते. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर होती. त्यातील चौगुलेंचा आज मृत्यू झाला. आणखी दोन-तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातातील जखमींमध्ये मावळमधील संतोष घारे (30), शंकर घारे (34), अमित नाईक (35), मेघा नाईक (33), मिलिंद बंगोडे( 32) व विना बंगोडे (25), डॉ. अनिल निर्मल (21), संदीप यादव (27), नंदिनी शेठ (72), स्नेहल मंडलिक (38), प्रमोद चुसमाड (25) यांचा समावेश आहे.