आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Pune Express Partially Closed For A Week, Landslide Work From Thurday

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उद्यापासून कामे, वाहतूक सुरुच राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रेनच्या सहाय्याने आडोशी बोगदा येथील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीची आणि दरड कोसळलेल्या भागाची पाहणी  करताना मंत्री एकनाथ शिंदे - Divya Marathi
क्रेनच्या सहाय्याने आडोशी बोगदा येथील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीची आणि दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करताना मंत्री एकनाथ शिंदे
पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याचे काम व अन्य सुरक्षा विषयक कामे करण्यास उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे. ही कामे करताना प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल व कमी वर्दळ असताना कामे केली जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मागील काही दिवसापासून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दरडी कोसळत आहेत. रविवारी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा मृ्त्यूचा हायवे आहे का अशी टीका झाली होती. पावसाळ्यात दरडी कोसळतात. आता कुठेतरी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन-तीन महिने पाऊस पडणार आहे. मात्र, या मार्गावर सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने या दरडी काढण्याचे काम तत्काळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लेन बंद करून दरडी काढल्या जाणार आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा या उद्देशाने वाहतुकीची वर्दळ नसताना कामे केली जातील असे मंत्री शिंदे यांनी सांगितले. दगड, माती याची तपासणी करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महामार्गावरील काम सुरु असताना वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार हे स्पष्ट केले आहे.
पुढे पाहा, मंत्री एकनाथ शिंदे रस्त्याची पाहणी करतानाचे PHOTOS...