आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, पाच ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सोमवार सकाळी दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात पाच जण ठार झाल्याची माहिती आहे. आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान कामशेतजवळ हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईकडे जात असलेली एक कार दुभाजक तोडून समोरून येणा-या कारला धडकली आणि हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीज ठार झाले. या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(छायाचित्र - संग्रहित)