आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai pune Old Highway Accident, 3 Died, 5 Injured

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघातात नगर जिल्ह्यातील 3 ठार, 5 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- टेम्पो आणि झायलो मोटारीची जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कान्हेफाट्याजवळ सामोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कान्हे फाटा येथील सूर्या ढाब्यासमोर झाला. सर्व जखमींवर सोमाटणे येथील बडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भाऊसाहेब भानुदास घोडके, सुभाष सोपान भसावे, त्रिंबक खाडे (सर्व रा. पाथर्डी, जि. नगर) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राजेंद्र चिमाजी भसावे, कृष्णा भगवान घोडके, भाऊसाहेब रामा मुंडे, गोपीनाथ निवृत्ती घोडके, पार्वती अदिनाथ भसावे, अर्चना खाडे, मच्छिंद्र कारभारी घोडके आणि एक दीड वर्षांचा मुलगा (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. पार्थर्डी, जि. नगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मोटार नगरहून येऊन मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मुंबईकडून येणा-या टेम्पो चालकाचे कान्हेफाट्याजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो रस्तादुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्धबाजूला जाऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या एमएच 04-इएक्‍स-1346 क्रमांकाच्या मोटारीवर धडकला. त्यात मोटारतील 3 जण जागीच ठार झाले. तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले.