आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai\'s Wristler Narsingh Yadav Made Hattrick In Maharashtra Kesari

PHOTOS: पुन्हा नरसिंगम, महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदाची हॅटट्रीक, पाहा क्षणचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याजवळील भोसरीत पार पडलेल्या 57 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मुंबई उपनगरच्या नरसिंग यादवने सलग तिस-यांदा विजेतेपद मिळवत महाराष्ट्र केसरी बनण्याची हॅटट्रीक केली. त्याने अंतिम लढतीत मुंबईच्या सुनील साळुंखेवर अवघ्या अडीच मिनिटांत 8-0 असा विजय मिळवला व पुन्हा महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले. सलग तीन वेळा किताब पटकवणारा नरसिंग पहिलाचा कुस्तीपटू ठरला. मुंबई ग्रामीणमध्ये पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर कार्यरत यादवाला गृहमंत्री आर आर पाटील यांनी चांदीची गदा व स्कॉर्पिओ गाडी देऊन गौरव केला.
आम्ही पुढे तुम्हाला भोसरीतील स्पर्धेतील क्षणचित्रे दाखविणार आहोत छायाचित्राच्या माध्यमातून, तर पुढे क्लिक करून पाहत राहा...