आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Munde Against Munde Fighting Easy, Pankaja Munde Say

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मुंडे विरुद्ध मुंडे’ लढत सोपी असेल!, पकंजा मुंडे यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बीडमध्ये आगामी निवडणूक मुंडे विरुद्ध मुंडे अशी झाली तर आमच्यासाठी ती आजवरची सर्वात सोपी निवडणूक ठरेल. कारण बीडच्या जनतेचे आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर पूर्वीइतकेच प्रेम आणि विश्वास आहे, अशा शब्दांत भाजयुमोच्या प्रदेश अध्यक्ष आणि आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी आपला विश्वास बोलून दाखवला.


बीडमध्ये धनंजय मुंडे हे गोपीनाथराव किंवा पंकजा यांच्या विरोधात उभे राहण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता पंकजा म्हणाल्या की, तसे झाल्यास निवडणुकीकडे मुंडे विरुद्ध मुंडे असे न पाहता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशाच दृष्टीने पाहू. गोपीनाथ मुंडे यांनी आजवर लढवलेल्या सर्वच निवडणुका संघर्षमय होत्या. मात्र जनतेच्या प्रेमावर आणि विश्वासावरच ते विजयी होऊ शकले. त्यामुळे प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी आम्ही काळजी करत नाही.


लोकसभेसाठी गोपीनाथ मुंडेच
बीडमध्ये लोकसभेसाठी गोपीनाथ मुंडे हेच भाजपचे उमेदवार असतील. लोकसभा लढवण्याचा माझा विचार नाही, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडितअण्णा आणि पुतणे धनंजय यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे बीडमध्ये ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ असा संघर्ष रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


कॉलेज निवडणुका स्वागतार्ह
कॉलेजांत निवडणुका सुरू करण्याच्या प्रक्रियेचे पंकजा यांनी स्वागत केले. यामुळे तरुण राजकारणाशी जोडले जातील. त्यांच्या विचारांना चालना मिळेल. भाजयुमो कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.


पुण्यातून 9 पासून एल्गार यात्रा, समारोप मराठवाड्यामध्ये
गोपीनाथ मुंडे यांनी 1995 मध्ये राज्यात संघर्ष यात्रा काढून नेतृत्व प्रस्थापित केले होते. आता त्यांच्या कन्या पंकजा पालवे यादेखील एल्गार यात्रा काढणार आहेत. पुण्यातून 9 ऑगस्ट रोजी एल्गार यात्रा सुरू होईल. तिचा समारोप मराठवाड्यात होणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघ पिंजून काढले जातील. यात तरुणाईचे संघटन, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, समस्या सोडवणे यासाठी ही यात्रा आहे, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.