आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात टपरीवर चहा पिताना धक्का लागल्याने तरुणाचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बाणेर येथे चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरुन एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जवळ ही घटना घडली.
 
कुकरीने केले वार 
बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जवळ 2 तरुण टपरीवर चहा पित होते. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या आरोपीला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
क्षुल्लक कारणावरुन चिडलेल्या आरोपीने दोघांवर कुकरीने वार केल्याची माहिती आहे. हल्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघेही तरुणी इंदिरा वसाहत परिसरात राहत होते. घटनेनंतर आरोपी हल्लेखोर पसार झाला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...