आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरवड्यात एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याचा निर्घृण खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने किरकाेळ वादातून दुसऱ्या कैद्याचा डाेक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी घडली. सुखदेव मेघराज महापुरे (४३) असे मृत कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश दबडे (३५) याला ताब्यात घेतले अाहे.
 
दबडे हा खुनाच्या गुन्ह्यातील अाराेपी असून ताे येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भाेगत अाहे, तर सुखदेव महापुरे हा अपहरणाच्या गुन्ह्यातील अाराेपी होता. त्याला साडेतीन वर्षे तुुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या सात महिन्यांपासून  तो येरवडा कारगृहात होता. महापुरे आणि  दबडे हे एकाच बराकीत राहत हाेते.

शनिवारी दुपारी दाेघे कारागृहातील स्वयंपाक घरात काम करत हाेते. त्यावेळी त्यांच्यात किरकाेळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे महापुरे हा आपल्या बराकीत जाऊन बसला. या वेळी पाठीमागून येऊन दबडे याने महापुरे याच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तुरुंगात एकच धावपळ उडाली होती. दरम्यान, या घटनेनंतर तुरुंग प्रशासन कैद्यांत वाद होऊ नयेत  यासाठी प्रयत्न करत  आहेत. तसेच प्रत्येक कैद्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

दीड वर्षात राज्यभरातील कारागृहात १६९ कैद्यांचा मृत्यू
मुंबईतील भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये महिला कैद्याचा  तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याने  मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर कारागृहातील महिला कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर अाला असून राज्यभरातील विविध कारागृहांत गेल्या दीड वर्षात १६९ महिला-पुुरुष कैद्यांचा मृत्यू झाल्याची बाब राज्य कारागृह विभागाच्या अाकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.   

२०१४-१५ मध्ये राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहात ७० कैद्यांचा मृत्यू झाला. जिल्हा कारागृह वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये मिळून एकूण १०२ कैद्यांचा मृत्यू झाला. २०१६  मध्ये एकूण १२१ कैद्यांचा राज्यातील मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात मृत्यू झाला असून त्यात पाच महिला कैद्यांचा समावेश अाहे, तर चालू वर्षात अातापर्यंत ४८ कैद्यांचा मृत्यू झाला असून मंजुळा शेट्येसह तीन महिलांचा यात समावेश अाहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक २२ कैद्यांचे मृत्यू नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात झाले आहेत. त्यानंतर तळाेजा मध्यवर्ती कारागृहात १४ कैद्यांचे मृत्यू झाले अाहेत.

मृत्यू झालेल्यात शिक्षाधीन ५२ कैद्यांचा समावेश असून उर्वरित ६६ कैदी हे न्यायालयीन प्रकरणातील हाेते. सध्याच्या घडीला राज्यातील ५४ कारागृहांत ३१ हजार २१० बंदी असून त्यापैकी १४१८  कैदी महिला अाहेत. मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक ३४४ महिला कैदी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी अाहेत. दरम्यान,  हे आकडे चिंताजनक आहेत.   

मृत्यूचे प्रमुख कारण अाजारपण   
कारागृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात बहुतांश कैद्यांचा मृत्यू हा टीबी, एचअायव्ही, कॅन्सर, हृदयविकाराने झाला आहे. कारागृहात अाल्यानंतर ताणावामुळेही कैद्यांचा मृत्यू हाेताे. कारागृहात अात्महत्या करणाऱ्या कैद्यांचे प्रमाण नगण्य अाहे. काेणताही कैदी कारागृहात मृत झाल्यानंतर त्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी व न्यायालयीन अशा दाेन चाैकशी समिती नेमल्या जातात. त्यांचा अहवाल राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क अायाेगालाही सादर केला जाताे. मानवी हक्क अायाेगाला याबाबत काही अाक्षेप असतील, तर ते संबंधित गाेष्टीची दखल घेऊन दाद मागू शकतात.
 
बातम्या आणखी आहेत...