आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील कुख्यात गुंड स्वप्नील देशमुखची सिंहगडजवळ पूर्ववैमनस्यातून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कर्वेनगरमधील गुंड स्वप्नील देशमुख याची सिंहगडजवळ हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. दरम्यान, त्याच्यासोबत असलेला मित्र लपून बसल्याने तो वाचला. 
 
विशाल शेळके व स्वप्नील देशमुख हे मित्र असून, ते दोघे कर्वेनगरहून आतकरवाडीत पोचले. तेथून सिंहगडावर पायी चालत गेले व दुपारी साडेतीनला परत आले. गाडी घेऊन ते डोणजे दुधाणे वाडीतील दुधाणे यांच्या केदारेश्‍वर फार्म हाऊसवर आले. तेथे त्यांनी जेवण व मद्याची ऑर्डर दिली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सात-आठ जण तोंडाला फडके बांधून तेथे आले अन्‌ त्यांनी स्वप्नीलवर कोयत्याने वार केले. त्याच्या शेजारी बसलेल्या विशालने हॉटेलमधील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. त्यामुळे तो वाचला. त्या वेळी हॉटेलमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर मारेकऱ्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आणि डीव्हीआर पळवून नेला. 
बातम्या आणखी आहेत...