आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पतीकडून पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून; आरोपीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेचा खून करणारा आरोपी. - Divya Marathi
महिलेचा खून करणारा आरोपी.
पुणे- पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून तिचा खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी सांयकाळी पाच वाजता दिघी येथे घडली. प्रकाश शिंदे (वय 35, रा. महादेवनगर गल्ली, दिघी ) असे अटक केलेल्या पतीचे नाव असून तेजश्री शिंदे (वय 26) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश शिंदे याने आपली पत्नी तेजश्री हिला घरातील एका खोलीत नेऊन तिच्या डोक्यात पाटा घालून तिचा खून केला. यावेळी तिच्या घरात तेजश्री हिची जाऊ व सासू दोघी उपस्थित होत्या. आरोपी घराबाहेर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अद्याप खूनामागील कारण स्पष्ट झाले नसून दिघी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...