आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: नातवाची हत्या करून आजोबाची 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनय शहा व सुधीर शहा... - Divya Marathi
जिनय शहा व सुधीर शहा...
पुणे- पुण्यातील कोंढवा परिसरातील जैन शांतीनगर सोसायटीत राहणा-या एका आजोबानी आपल्या 10 वर्षीय नातवाची गळा दाबून हत्या करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नातवाची हत्या केल्यानंतर 65 वर्षीय आजोबांनी 7 व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या आजोबाचा जागीच मृत्यू झाला आहे. जिनय शहा (वय-10) असे हत्या झालेल्या नातवाचे तर सुधीर दगडूमल शहा (वय- 65) असे आत्महत्या केलेल्‍या आजोबाचे नाव आहे. दरम्यान, या या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सगळे जण जेवण आटोपन झोपले. जिनयचे आईवडील बेडरूममध्ये तर जिनय आजोबांसोबत हॉलमध्ये झोपला. पहाटेच्या सुमारास सुधीर शहा यांनी जिनयचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
नातवाच्या मानेवर, गळ्यावर जखमा व खुणा दिसत असल्याने या आजोबांनी नातवाची हत्या केली असावी व त्यानंतर 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घरगुती वादातून हे प्रकरण झाल्याचे समोर येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, सुधीर यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे ती उशिरा मिळाली आहे.
पुढे वाचा, सुधीर शहा यांनी का केली आत्महत्या, नातूची का केली हत्या?
सुधीर शहा यांची सुसाईड नोट जशीच्या तशी....