आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूत संगीत संग्रहालय, पंडित भीमसेनजींच्या वस्तूंचे जतन होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशाची अभिजात संगीताची परंपरा ज्यांनी आपल्या योगदानाने समृद्ध केली, त्या पं. भीमसेन जोशी यांच्या वापरातील काही वस्तूंचे देशातील पहिल्या संगीत संग्रहालयात जतन करण्यात येणार आहे. हे संग्रहालय बंगळुरू येथे उभारण्यात येत आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताची कलाकारांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न देशात प्रथमच उभारण्यात येत असलेल्या संगीत संग्रहालयात होणार आहे. या संग्रहालयाच्या वतीने पं. भीमसेन जोशी यांच्या नित्य वापरातील काही वस्तू मिळाव्यात, अशी मागणी जोशी कुटुंबीयांकडे नुकतीच करण्यात आली. त्या विनंतीला मान देऊन भीमसेनजींच्या वापरातील जॅकेट, शाल, त्यांचा पानाचा डबा आणि अडकित्ता या वस्तू संग्रहालयासाठी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भीमसेनजींच्या कन्या शुभदा मुळगुंद यांनी दिली.
संगीत या विषयावर असे संग्रहालय देशात प्रथमच उभारण्यात येत आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे, असे त्या म्हणाल्या.

यांच्याही स्मृती जपणार
इंडियन म्युझिक एक्स्पिरियन्स या संस्थेच्या वतीने हे संग्रहालय उभारण्यात येत आहे. भीमसेनजींप्रमाणेच उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची सनई, सुब्बलक्ष्मी यांची साडी आणि तानपुरा, पं. रविशंकर यांच्या काही वस्तूही संग्रहालयात जतन केल्या जातील.