आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musician Anand Modak No More, Died At 63 After Heartattack

जादूई सुरांचा संगीतकार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी चित्रपट : रमा माधव, विमुक्ता, एलिझाबेथ एकादशी, मालक

चित्रपट, नाटक, मालिका, ध्वनिफिती, सीडी आणि रंगमंचीय कार्यक्रमांना आपल्या संगीताच्या जादूने वेगळे परिमाण देणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद गोपाळ मोडक (63) यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले.

‘महानिर्वाण’ या 1974 मधील नाटकाला मोडक यांनी संगीत दिले आणि संगीतकार या नात्याने त्यांचा जो सुरेल प्रवास सुरू झाला तो अखेरपर्यंत कायम होता. अगदी गुरुवारी रात्रीही उशिरापर्यंत ते रेकॉर्डिंग स्टुडिओतच होते. सुमारे 37 वर्षांच्या कारकीर्दीत मोडक यांनी नाटक, चित्रपट, मालिका, आकाशवाणी-दूरदर्शन, ध्वनिफिती, सीडीज, संगीतिका तसेच रंगमंचीय कार्यक्रमांतून आपल्या संगीत रचनांची जादू रसिकांसमोर नेली. तब्बल सहा वेळा मोडक राज्य पुरस्काराचे मानकरी ठरले. तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड, अल्फा व झी गौरव, मटा सन्मान, चैत्रबन पुरस्कार, कुमार गंधर्व पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनुराधा पौडवाल तसेच अंजली मराठे या दोन्ही गायिकांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. आकाशवाणीच्या अँडिशन कमिटीचेही ते सदस्य होते.

सीडी व ध्वनिफिती
भावधारा, बासरीचा सूर आला, तुझियासाठी, ओंजळीत स्वर तुझेच, तुझ्याविना, सद्गुरू, गंध मातीचा

>गाजलेले रंगमंचीय कार्यक्रम
अमृतगाथा, प्रीतरंग, साजणवेळा, आख्यान तुकोबाराय, शेवंतीचं बन, आज या देशआमध्ये, स्मरणयात्रा

>गाजलेल्या नाट्यकृती
महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा, पडघम, तुमचे आमचे गाणे, जळ्ळी तुझी प्रीत, महापूर, खेळिया, मृगय, चाफा बोलेना, वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा, उत्तररात्र.

>प्रमुख चित्रपट
22 जून 1857, सूर्योदय, चौकट राजा, कळत नकळत, एक होता विदूषक, लपंडाव, दोघी, मुक्ता, सरकारनामा, राजू, बाईमाणूस, मायबाप, सावर रे, उरूस, फकिरा, हरिश्चंद्राची फॅक्टरी

>मालिका
देखो मगर प्यार से, उपन्यास, पंखो से पंजो तक, चिमणराव, निवडक पुल, चाळ नावाची वाचाळ वस्ती, मनोगत, राऊ, एक चिरंतन ज्योती, अध्यात ना मध्यात, ऋण फिटता फिटेना, नंदादीप, पेशवाई.