आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Poem Will Be Alive Therefore This, Poet Mangesh Padgaonkar Say

‘माझी कविता जिवंत राहावी म्हणून...’, कवी मंगेश पाडगावकरांनी उलगडले रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘कुठल्याही पक्षाच्या, विचारसरणीच्या, ‘इझम’च्या काठीला बांधलेला रंगीत झेंडा आपल्या खांद्यावर घेऊ नका. तुम्ही तसे केलेत तर तुमचे खांदे घोकलेल्या घोषणा ओकू लागतील. मग शिस्तीने बळावलेली बंदूक तुमच्या खांद्यावर चालेल. खांद्यावर झेंडा आला की हिंसा अटळच....कवी म्हणून मी कशाचीही बांधिलकी मानत नाही. माझी कविता जिवंत राहावी म्हणून मी ‘मोकळिकी’ मानतो,’ या शब्दांमध्ये ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या चिरतरुण कवितेचे रहस्यच जणू उलगडले.


महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे पाडगावकर यांना गुरुवारी पुण्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. त्यानंतर पाडगावकर यांच्या हस्ते पत्रकारिता-साहित्य गौरव पुरस्काराचे वितरण झाले. नानासाहेब वैराळे स्मृती ज्येष्ठ संपादक पुरस्कार ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांना, तर ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक अध्यक्षस्थानी होते.


पुढा-याचा ‘मुख्य मुद्दा’
एक पुढारी मध्यरात्री झोपेतून उठला
कॉटवर उभा राहून भाषण करीत सुटला
जागी होऊन बायको बोलली
अहो, प्लीज भाषण आवरा, (धोतर सुटलं)
‘मुख्य मुद्दा’ आधी आवरा...
या पाडगावकरांच्या वात्रटिकेला जोरदार हशा मिळाला.