आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी काळी करायचा सुरक्षारक्षकाचे काम, आता करतोय बिग बीला सोबत घेऊन चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बी सोबत नागराज मंजुळे. - Divya Marathi
बिग बी सोबत नागराज मंजुळे.
पुणे- 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. ते बिग बी बरोबर चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे विद्यापीठात होत असल्याने काही लोकांनी याबाबत आक्षेप घेतला होता. नागराज हे स्वत: पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या जीवनात बराच संघर्ष केला आहे.
 
असा घडला नागराज
- सैराटच्या अफाट लोकप्रियतेनंतर आता नागराज मंजुळे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी अमिताभ बच्चनला साईन केले आहे.
- अमिताभ आणि नागराज यांच्यामध्ये मागील दीड वर्षापासून चर्चा सुरु आहे. जानेवारी अमिताभ यांनी त्याच्यासोबत काम करण्याविषयी होकार कळवला.
- नागपूरमधील फुटवॉल कोच विजय बारसे यांना घेऊन बनविण्यात येणाऱ्या या चित्रपटाची चित्रीकरण सुरु आहे. बिग बी या चित्रपटात व्हिलनचा रोल करत आहेत. 
 
कोण आहेत नागराज मंजुळे?
- नागराज यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात झाला. घरात गरिबी असल्याने नागराजचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचे भाऊ बाबुराव मंजुळे यांनी त्यांना दत्तक घेतले. लहानपणापासून नागराजला चित्रपट पाहण्याचा आणि गोष्टी ऐकणे आवडायचे. त्यामुळे ते स्कूल बंक करुन आपल्या मित्रांसमवेत चित्रपट पाहण्यासाठी जात होते.
 
कधीकाळी करत होते सुरक्षारक्षकाचे काम
- चित्रपट पाहण्यासाठी आणि नशेसाठीही नागराजकडे पैसे नसत. त्यामुळे नागराज यांनी आपले लक्ष पुस्तके वाचण्यावर केंद्रित केले.
- त्यानंतर त्यांनी मराठी एम. ए. केले. एम. फिल. करत असतानाच त्यांनी मास कम्यूनिकेशनला अॅडमिशन घेतले.
- काही काळानंतर त्यांची निवड महाराष्ट्र पोलिसात झाली. पण काही काळातच ते ही नोकरी सोडून घरी परतले.
- पैशाची चणचण जाणवू लागल्यावर त्यांनी सुरक्षारक्षकाची नोकरी केली. ते दिवसा इस्त्री करण्याचे काम करायचे.
 
चौथीत असताना त्यांना लागली दारुची सवय
- नागराज चौथीत असताना त्यांना दारुची सवय लागली. त्यांचे वडील त्यांना दारु आणण्यासाठी त्यावेळी ते वडिलांसाठी आणत असलेल्या दारुतीलच काही दारु स्वत: सेवन करायचे. ते त्या बाटलीत तेवढ्याच मापाचे पाणी भरायचे. त्यांनी सातवीत असताना दारु सोडली पण त्यांना गांजा आणि सिगारेटचे व्यसन लागले. ते सिगारेट ओढणाऱ्यांच्या जवळ उभे राहायचे आणि त्यांनी फेकून दिलेली उरलेली सिगारेट ओढायचे.
 
19 व्या वर्षी लग्न 34 व्या वर्षी घटस्फोट
- नागराजचे लग्न 1997 मध्ये सुनिता नावाच्या मुलीसोबत झाले. तेव्हा ते 19 वर्षाचे होते आणि 12 वीत शिकत होते. लग्नानंतर 15 वर्षांनी 2012 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला व 2014 मध्ये घटस्फोट घेतला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...