आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीचा साक्षीदारही गुन्हेगाराच, त्यालाही शिक्षा करा- नयना पुजारीच्या कुटुंबियांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्यातील दाेषी याेगेश अशाेक राऊत, महेश बाळासाहेब ठाकूर व विश्वास हिंदुराव कदम यांना पुणे सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली.  न्यायालयाने माफीचा साक्षीदार राजेश पांडुरंग चाैधरी याची निर्दाेष मुक्तता केली अाहे.  मात्र माफीचा साक्षीदार चौधरीही गुन्हेगार असून त्यालाही शिक्षा करा, अशी मा‍गणी नयनाच्या कुटुंबियांनी केली आहे.

विशेष न्यायाधीश एल.एल.येनकर यांनी तिन्ही आरोपींना अपहरण, सामूहिक बलात्कार, जबरी चाेरी, खून, एेवज चाेरणे, कट रचणे या सहा गुन्ह्यांखाली दाेषी ठरवले.

न्यायालयाने निकाल देताना सांगितले की, नाेकरदार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही केस महत्त्वपूर्ण हाेती. या निकालामुळे समाजातील महिलांमध्ये चांगला संदेश पाेहाेचेल व गुन्हेगारांवर वचक बसू शकेल. अाराेपींचे कृत्य हे संगनमताने कट रचून केलेले असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले अाहे. अाराेपींनी एका तरुण साॅफ्टवेअर अभियंता महिलेचे अपहरण करून तिला नग्न अवस्थेत गाडीत फिरवत तिच्या असहायतेचा फायदा घेतला. 

अाराेपींविराेधात अशाच प्रकारची सेक्शन केस ७२/२०११ ही विशाखा मंडल बलात्कार व खुनाची केस प्रलंबित अाहे.
 
नयनाच्या नावाने ट्रस्ट स्थापणार
नयना पुजारी हिचे पती अभिजित पुजारी म्हणाले, ‘अाठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अाम्हास न्याय मिळाला. माफीचा साक्षीदार राजेश चाैधरी यास निर्दाेष साेडले याची खंत वाटते. आम्ही नयनाच्या नावाने ट्रस्ट स्थापन करणार अाहाेत. त्याद्वारे पीडित महिला अाणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल.
 
पुढील स्लाइडवर वाचा, नयनावर तीन वेळा झाला होता बलात्कार...
बातम्या आणखी आहेत...