आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naina Pujari Murder Case ; Fast On Women Day Against Police

नयना पुजारी खून खटला :पोलिसांच्या निषेधार्थ महिलादिनी उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारीच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे फरार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ खुल्या युवा व्यासपीठतर्फे आठ मार्च रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ मानवी साखळी व तीन दिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे माहिती तंत्रज्ञान अध्यक्ष अजय भारदे यांनी बुधवारी दिली.

फरार आरोपी राऊत याला लवकर अटक करावी व सदर खटल्यात आरोपी फरार झाल्यापासून पोलिस यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीचा लेखी खुलासा द्यावा या आमच्या मागण्या आहेत. या उपोषणात नयनाचे पती अभिजित पुजारी व कुटुंबीय मित्र परिवार सहभागी होणार आहेत.अत्याचारासंबंधी प्रकरणात प्रत्येक पोलिस चौकीत महिलांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र विभाग असावा. पीडित महिलेबाबत गुन्हा नोंदवताना तो महिला सरकारी वकिलाच्या उपस्थितीत दाखल करावा, तसेच असे खटले द्रुतगती न्यायालयात चालवण्याची मागणी भारदे यांनी केली.