आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naina Pujari Murder Case: Offender Yogesh Raut Escaped The Helping Of Doctors, Advocate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नयना पुजारी खून प्रकरण: आरोपी योगेश राऊत याचे वकील, डॉक्टरांच्या मदतीने पलायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी डॉक्टर, वकिलाची मदत घेतल्याचा गौप्यस्फोट केला.

पळून जाण्याचा सल्ला त्याचे वकील बी. ए. अलूर यांनी दिला होता, तर तुरूंगाबाहेर बाहेर पडण्यासाठी कारागृहातील डॉक्टरांनी अंगाला खाज सुटत असल्याचा खोटा अहवाल दिला असल्याचा जबाब योगेशनेच पोलिसांना दिला आहे.

‘या प्रकरणात सुटकेची शक्यता नसल्याने पळून जाण्याव्यतिरिक्त मार्ग नाही. असे अलूर यांनी सांगितले. फाशी होण्याच्या भीतीने मी खचलो होतो’, असेही तो म्हणाला. कारागृहातील डॉक्टरांना पैसे दिल्यानंतर त्यांनी मला ससून येथे पाठवण्याची व्यवस्था केली व लघुशंकेचे कारण करून आपण पळाल्याचे योगेशने सांगितले. दरम्यान, अलूर यांनी आरोपाचे खंडन केल. पोलिस मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी नोटीस पाठवणार असल्याचे ते म्हणाले.