आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naina Pujari Murder Case : Offenders Have Habit To Steal Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नयना पुजारी खून खटला: आरोपींना होती महिला पळवून नेण्याची सवय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील चार आरोपींना महिलांना पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची सवय होती, अशी माहिती मुख्य आरोपी योगेश राऊतच्या जबाबातून उघड झाली. सदर आरोपींनी नयनाला पळवण्याआधी दोन महिलांना पळवून त्यांच्यावर अत्याचार करून एकीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

योगेश व त्याचा साथीदार विश्वास कदम हे दोघे 2008 मध्ये खराडी भागातील झेन्सर प्रा. लिमिटेड कंपनीत कारचालक होते. जून 2009 मध्ये एका रात्री राऊत व कदम हे इंडिकातून शिवाजीनगर भागात त्यांना मनपाच्या पुलावर वेश्या दिसली. त्यांनी तिला रेंज हिल्स भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. नंतर जिवे मारण्याची धमकी देत तिला सोडून ते निघून गेले होते. नंतर दीड महिन्याने राऊत व कदम कंपनीतून हडपसर मुंढवा स्टॉपरून एका 24 ते 25 वर्षीय महिलेसे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. केसनंद फाटा येथे नेवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. नंतर राऊतने महेश ठाकूर यास फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले. नंतर ओढणीने गळा आवळून तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला.

या घटनेनंतर दोन महिन्यांनी राऊत, कदम व ठाकूर यांनी खराडी रस्त्यावरील बसस्टॉपवर उभ्या असलेल्या 25 ते 26 वर्षीय तरुणीवर केसनंद फाटा परिसरात अत्याचार केले. तसेच साथीदार राजेश पांडुरंग चौधरी यालाही राऊतने फोन करून तेथे बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले. खेड घाटात नेवून तिचा गळा आवळून तिला ठार करण्यात आले. या महिलेच्या एटीएमचा वापर करून आरोपींनी तिच्या बॅँक खात्यातून 45 हजार रुपये काढले. घटनेनंतर 4-5 दिवसांनी आरोपींना पोलिसांनी अटक केली.