आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naina Pujari Murder Case : Rajesh Chaudhari Want To Be Eyewitness

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नयना पुजारी खून खटला : राजेश चौधरीला पुन्हा व्हायचंय माफीचा साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यातील सुरुवातीचा माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याने खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्यानंतर न्यायालयात आपणास पुन्हा आरोपी क्रमांक दोन करण्यात यावे, अशी विनंती केली होती. परंतु राऊत याला नुकतीच अटक झाल्याने या प्रकरणात पुन्हा माफीचा साक्षीदार होण्याची तयारी चौधरीने दाखविली आहे. याबाबतचा अर्जही विशेष सत्र न्यायाधीश साधना शिंदे यांच्या न्यायालयात मंगळवारी सादर केला. फरार झालेला आरोपी योगेश राऊत चौधरीच्या कुटुंबीयांना धमकी देत होता. या भीतीपोटीच यापूर्वी चौधरी याने मला पुन्हा आरोपी होण्याबाबत अर्ज केला होता.


मात्र पुणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी राऊत याला अटक करुन सदर गुन्हयात वर्ग केल्यानंतर चौधरी याने आता पुन्हा माफीचा साक्षीदार करावा असा अर्ज दाखल केला आहे. या खटल्यात राऊत फरार असताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी प्रमोद अगरवाल हा पंच व राऊतचा मित्र विजय ननावरे यांच्या साक्ष नोंदवल्या होत्या. बचाव पक्षाचे वकील बी.ए.अलूर यांनी सदर दोन्ही साक्षीदारांची मंगळवारी पुन्हा उलटतपासणी घेतली.