आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकर यांना अस्मिता पुरस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माईर्स एमआयटी शिक्षणसंस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे यंदाचे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे संचालक प्रा. एस. परशुरामन, मथुराचे खासदार जयंत चौधरी, अभिनेते नाना पाटेकर, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे (सीएसआयआर) महासंचालक प्रा.समीर कुमार ब्रह्मचारी, बीआयजी सिनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बसू यांना जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती एमआयटी बिझनेस स्कूलचे संचालक डी. पी.आपटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आपटे म्हणाले, पुरस्काराचे हे आठवे वर्षे आहे. प्रत्येकी सव्वा लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तीन फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.विजय भटकर, डॉ.यशपाल, श्याम बेनेगल, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड, उद्योजिका रितू नंदा यांच्या हस्ते वितरण होणार आहे.