आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लायकी नसणाऱ्यांना जास्त महत्त्व देऊ नका, नाना पाटेकरांची सलमान खानवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘देश सर्वात महत्त्वाचा. देशापुढे आमची किंमत शून्य आहे. आपले जवान हेच देशाचे खरे हिरो आहेत. देश आधी, कलाकार नंतर.. हे लक्षात ठेवा आणि लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका’, अशा स्पष्ट शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी अप्रत्यक्षपणे अभिनेता सलमान खानवर टीका केली. पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा काही सलमान देत नाही, असेही ते म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बाेलत हाेते.

उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना ‘चालते व्हा’ असा इशारा दिला हाेता. त्यावर सलमान खानने ‘ते कलाकार आहेत, दहशतवादी नाहीत,’ असे वक्तव्य केले हाेते. त्याचा समाचार घेताना नाना म्हणाले, ‘जवानांप्रती ज्यांना आदर नसेल, त्यांचा आदर आपणही करू नये.’ असेही ते म्हणाले.

‘मला आजवर कुणीही जात विचारली नाही आणि जात सांगून काही करण्याची माझ्यावरही वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. मला कधीच कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही’, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

संघर्ष आणि सामर्थ्य : शहरांतील श्रमजीवींच्या कथा, या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
बातम्या आणखी आहेत...