आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गो. पु. देशपांडे यांना तन्वीर पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अखिल भारतीय स्तरावर रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना रूपवेध प्रतिष्ठानतर्फे तन्वीर सन्मानाने सन्मानित केले जाते. यंदाचा तन्वीर पुरस्कार ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांना तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक व नाट्य दिग्दर्शक वामन पंडित यांना जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लागू व कायर्वाह दीपा लागू यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्काराचे वितरण नऊ डिसेंबर रोजी ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी डॉ. माया पंडित व सतीश आळेकर उपस्थित राहणार आहेत. विनोद हे नटाचे असतात. दिग्दर्शकाचे नाही असे ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार यांनी विधान केले होते. याबाबत लागू म्हणाले, एलकुंचवार हे विनोदी लेखक आहेत. अशी विधाने करतात तेव्हा ते विनोदाचा आधार घेत असतात. त्यांचे विनोद गांभीर्यपूर्ण असतात. नाटक जगवण्यासाठी जी मंडळी अनुदान देतात, त्यांच्यात जागृती होते हे महत्त्वपूर्ण आहे. नाटक करणारे काहीतरी फालतू करतात, असा दृष्टिकोन न राहता ते काहीतरी चांगले करत आहेत असेही त्या म्हणाल्या.