आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता हिशेबाची पाळी कॉंग्रेसची, नरेंद्र मोदींचे आव्‍हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘मी दहा महिन्यांपूर्वीच माझ्या कामाचा हिशेब जनतेला देऊन आलोय. त्यामुळेच सलग तिसºयांदा गुजरातच्या जनतेने एक तृतीयांश बहुमतासह मला निवडून दिले. गुजरातच्या नावावर तुम्ही खोटे बोलू नका. जनतेत संभ्रम निर्माण करू नका. कॉँग्रेसच्या मित्रांनो, तुम्ही गेल्या दहा वर्षांत काय केले याचा हिशोब जनतेला द्या. सरकार मनमोहनसिंग यांचे आणि उत्तर देणार मोदी, हे आता चालणार नाही,’ या शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर तोफ डागली.
‘आता निवडणूक लोकसभेची आहे. विधानसभेची नाही. दिल्लीत बसलेल्या सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याचा लेखाजोखा काँग्रेसने मांडला पाहिजे. जनतेनेही त्यांना जाब विचारावा. पण दररोज मोदीला प्रश्न विचारण्याची फॅशनच झालीय,’ असा टोलाही मोदींनी लगावला. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मोदी आले होते. लोहगाव विमानतळावर त्यांचे पदाधिकाºयांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी झालेल्या स्वागत सभेत ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

(कपील सिब्बल यांनी मोदींना दिले चर्चेचे खुले आव्हान)
दिल्लीच्या सत्तेवर सगळे दास असले पाहिजे नाथ नाही. याचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले, दिल्लीत जनतेचा सेवक बसला पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये, मोरारजी सरकारच्या काळात महागाई नियंत्रणात