आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरच तयारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज दुपारी पुण्यात येत असून, शहर भाजपतर्फे त्यांचे लोहगाव विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मुख्य विमातळापासून काही अंतरावर स्वागत समारंभाची तयारी करण्यात येत असून, तेथेच ते कार्यकर्त्यांना छोटेखानी भाषण वजा मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर ते प्रथमच पुण्यात येत आहेत. मागील तीन महिन्यापूर्वी मोदींची भव्य सभा पुण्यात आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांना पक्षाने अधिकृतरित्या पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले नव्हते. त्यामुळे शहर भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. यावेळी ते भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे कळते. मात्र ते 10-15 मिनिटेच बोलतील.
यानंतर ते थेट मंगेशकर हॉस्पिटलच्या दुस-या टप्प्याचे उदघाटन करण्यासाठी चाडेचार ते साडेपाच यादरम्यान हजेरी लावतील. त्यानंतर ते गरवारेच्या प्रांगणात भाषण करणार आहेत. मात्र हे भाषण राजकीय असणार नाही. हा वैयक्तिक कार्यक्रम असल्याने ते जनरल विषयावर बोलतील. यावेळी मंगेशकर कुटुंबिय उपस्थित असतील. त्यानंतर सहा वाजता विमानाने पाटणा येथे रवाना होणार आहेत. पाटण्यातील सभेदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांची आज रात्री ते भेट घेणार आहेत. त्यामुळे मोदी आज पुण्यात दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत म्हणजे तीन तास घालविणार आहेत.