आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या हस्ते मंगेशकर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आता गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचेही पाठबळ मिळाले आहे. शुक्रवारी पुण्यात एका शानदार सोहळ्यात लतादीदींनी मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. नाजूक आवाजात त्या म्हणाल्या, ‘हम जो चाहते हैं, आप जो चाहते हैं, कि नरेंद्रभाई पीएम की जगह नजर आएं, ये सबकी इच्छा है.’ हे ऐकून हजारो पुणेकर श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मोदी यांनीही मान लवून लतादीदींना नमस्कार केला आणि आभार मानले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी मोदींची टिपलेली छायाचित्रे....