आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi At Pune,may Attack On Kalmadi & Congress

नरेंद्र मोदी पुण्यातील सभेत सुरेश कलमाडी व काँग्रेसला लक्ष्य करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सर परशुरामभाऊ (एसपी) कॉलेजवर होणा-या सभेसाठी पुण्यात दाखल होत आहेत. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यासाठी नगरमधील सभा आटोपून मोदी पुण्याकडे रवाना झाले आहेत. तासाभरात ते पुण्यातील सभेस्थानी पोहोचतील.
या सभेत ते कॉमनवेल्थ घोटाळ्यात अडकेलेले काँग्रेसचे निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्याविरोधात हल्लाबोल करतील. याचबरोबर शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांच्यासह काँग्रेसला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात मोदींनी गांधी घराण्याला लक्ष्य केलेच आहे. त्यामुळे आजच्या पुण्यातील सभेत मोदी धुमधडाका करण्याची शक्यता आहे. शरद पवारांनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मात्र, येथे मनसेने उमेदवार दिले आहे त्यामुळे राज ठाकरेंबाबत ते बोलतात का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
या सभेकरिता पुणे जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार उपस्थित राहणार आहेत. यासाठी मागील दोन दिवसापासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात शेकडो मुख्य चौकात महायुतीचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने घोषणा देत पत्रके वाटत नागरिकांना सभेकरिता निमंत्रित करत होते.
पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवार अनिल शिरोळे, महदेव जानकर, शिवाजीराव आढळराव- पाटील आणि श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सभेची तयारी केली आहे. सभास्थानी 40' X 60' व 15 X 10' असे 2 स्टेज उभारले आहे. नागरिकांना विनासायास मोदींचे भाषण ऐकता यावे ह्याकरता सभा स्थानी 8 LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहन व्यवस्था न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, नुमवि प्रशाला, माएसो चे भावे स्कूल आणि रेणुका स्वरूप शाळेचे मैदान, गणेश कला क्रीडा मंच येथील पार्किंग, महाराष्ट्र मंडळ शाळेचे मैदान, नदी पत्र डी पी रस्ता येथे करण्यात आली आहे. पुणे लोकसभा निवडणूक संयोजक प्रदीप रावत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहराच्या मध्य वस्तीत शक्यतो वाहने आणणे टाळावे. तसेच नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, कॅमेरे आणू नयेत व सुरक्षा रक्षकांना सहकार्य करावे. सर्व नागरिकांनी मुख्य प्रवेश द्वारातून प्रवेश करावा.