आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Attack On Congress & Ncp At Sangali

कल्पना गिरींचा मुद्दा उचलत मोदींनी सोनियांना केले लक्ष्य, निर्भया फंडाचे काय झाले?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- सांगली जिल्ह्याने अनेक बडे नेते दिले. चार-चार पिढ्या राजकारणात असल्याने मला हा भाग सुजलाम-सुपलाम असेल असे वाटत होते. मात्र माझा भ्रमनिरास झाला. कृष्णा नदीसारखी मोठी नदी असूनही अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा दुष्काळी कसा काय? असा सवाल करीत भाजपचे पंतप्रधानपदाचे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते सांगलीपर्यंत वंशवादच आहे, आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगत काँग्रेसला पराभूत करा असे आवाहनही केले.
सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील व हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी आज दुपारी सांगलीत सभा घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, प्रकाश शेंडगे उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, या जिल्ह्याने अनेक बडे नेते दिले. तरीही इथला विकास काहीही झालेला नाही. कृष्णा नदीसारखी बलाढ्य नदी येथून वाहते पण अर्धा जिल्हा दुष्काळी आहे. येथेही चार-चार पिढ्या राजकारणात असल्याचे सांगत वसंतदादा पाटील घराण्यावर टीका केली. सांगली चांगली बनविण्याचे वचन मी तुम्हाला देतो. हे काँग्रेसवाले तुम्ही घरी बसवा. येथील लोकांसाठी, शेतक-यांसाठी या सरकारने काहीही केले नाही. शेतक-यांना देशोधडीला लावले. आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतीच्या उत्पादनावर येणारा खर्च धरून उत्पादनावर किमान 50 टक्के नफा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. हा मुद्दा देशातील शेतक-यांचे भवितव्य बदलून टाकेल. आज देशातील शेतकरीच का आत्महत्या करीत आहेत याचा विचार या सरकारने कधीही केला नाही. आता वेळ आली या सर्वांना दूर करण्याची. महाराष्ट्राला आज वचन देतो की, महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. देश बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही याची काळजी घ्या. राजू शेट्टींसारख्या दमदार व प्रामाणिक शेतकरी नेत्यांमुळे शरद पवारांची धडकी भरते अशा शब्दात शेट्टींचे कौतुक केले.
सांगलीतील सभेनंतर मोदींची सोलापूरात सभा झाली. तेथेही मोदींनी काँग्रेससह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. वाचा पुढे मोदी काय म्हणाले सोलापूरात आणि लातूरात...