आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती मुद्द्यावर नरेंद्र मोदींना कॉँग्रेस आघाडी घेरणार !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना पत्नी असल्याचा गौप्यस्फोट केला. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी ही माहिती लपवून ठेवली. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पुण्यात दिली. कॉँग्रसेनही याबाबत कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे.

मोदी यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्या वेळी त्यांनी उमेदवारी अर्जात पत्नीचा उल्लेख केला नव्हता. शपथेवर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देऊन मोदींनी देशाच्या जनतेची आणि निवडणूक आयोगाची फसवणूक केली. शपथेवर खोटे बोलणे हा गुन्हा आहे. याबद्दल त्यांचा अर्ज बाद केला पाहिजे, अशी मागणी आयोगाकडे करणार असल्याचे मलिक म्हणाले.

विवाहित व्यक्ती पूर्णवेळ स्वयंसेवक कसा?
संघाचीही फसवणूक

‘उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रतिज्ञापत्रात सर्व माहिती देणे बंधनकारक असताना मोदींनी यांनी यापूर्वी पत्नी जशोदाबेन यांचा उल्लेख कधीच केला नव्हता. आता त्यांनी कशाच्या आधारे पत्नीचा स्वीकार केला? नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक होते. अविवाहित माणसालाच पूर्णवेळ स्वयंसेवक होता येते. परंतु विवाहित मोदींनी संघाचीसुद्धा फसवणूक केल्याचे दिसते,’ असा चिमटाही नवाब मलिक यांनी मोदी व भाजप नेत्यांना काढला.

‘ती’ तरुणी पॅरिसमध्ये!
गुजरातमधील एका तरुणीवर पाळत ठेवल्याचा नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आहे. ‘त्या’ तरुणीवर मोदी लट्टू झाल्याने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून तिच्यावर गुप्त पाळत ठेवल्याची माहिती निलंबित अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. मोदींच्या गुप्त पाळतीचे हे ‘स्नूपगेट’ प्रकरण गेल्या वर्षी उघडकीस आले होते. की स्नूपगेट प्रकरणातील ‘त्या’ तरुणीला आई-वडिलांसह पॅरिसला नेऊन ठेवण्यात आले आहे. याचा उल्लेख करत मलिक यांनी यावेळी केला.

आजपर्यंत माहिती का दडवली : सावंत
नरेंद्र मोदी यांनी पत्नीबाबत माहिती लपवल्याबद्दल मोदींवर काही कायदेशीर कारवाई करणे शक्य आहे का, याची चाचपणी काँग्रेसनेही सुरू केली आहे. मोदींचे जर लग्न झालेले होते तर मग त्यांनी ही माहिती आतापर्यंत निवडणूक आयोगापासून का दडवली, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गुरुवारी दिल्लीत काँग्रेसच्या निवडणुक समितीची एक बैठक झाली असून त्यात या मुद्द्यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.