आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Kumbhmela News In Marathi, Sambhaji Brigade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंभमेळा रद्दची याचिका संभाजी ब्रिगेडकडून मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नाशिकमधील कुंभमेळा रद्द करण्याची मागणी करणारी संभाजी ब्रिगेडने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (ग्रीन ट्रॅब्युनल) दाखल झालेली याचिका बुधवारी मागे घेतली.

गोदावरी तीरावर दर बारा वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्यामुळे नदी व पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुंभमेळ्याचे आयोजन थांबवावे व यासाठी केला जाणारा खर्च सामाजिक प्रश्नांवर खर्च करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे केली होती. न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली.

कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीत मोठे प्रदूषण होते. त्यामुळे सोहळा थांबवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्र्यंबक नगर परिषद, नाशिक महापालिका व नाशिकचे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले होते. नदी प्रदूषणासंदर्भात यापूर्वीही अनेकांनी याचिका केल्या होत्या.

त्यामुळेच संभाव्य प्रदूषणावर देखरेखेसाठी हायकोर्टाच्या आदेशाने समिती स्थापन केली आहे. समितीने पर्यावरण रक्षणाचे काम केले नाही तर नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी संभाजी ब्रिगेडला देण्यात येईल, असे न्यायमूर्तींनी सांगितल्यानंतर याचिका मागे घेण्यात आली.