आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Play Of Nasruddin Shaha In Pune On 27 Feb 2015

पुणेकरांना येत्या 27 तारखेला नसिरुद्दीन शहा यांचा प्रयोग पाहण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांचा रुपेरी पडद्यावरील प्रगल्भ अभिनय आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत. मात्र, त्यांना रंगभूमीवर ‘लाइव्ह’ अभिनय करताना पाहणे, हा एक वेगळा अनुभव नाट्यरसिकांना पुण्यात मिळणार आहे.
२७ फेब्रुवारीला बालगंधर्व रंगमंदिरात नसिरुद्दीन शहा ‘इस्मत आपा के नाम’ या नाटकात नसिरुद्दीन यांच्या रंगभूमीवरील अभिनयाचे रंगही रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्यांच्यासोबत रत्ना पाठक-शहा आणि हिबा शहा यांच्याही भूमिका आहेत.

गाजलेली बहुभाषिक नाटके पाहण्याची संधी रसिकांना मिळवून देणारा ‘विनोद दोशी नाट्यमहोत्सव’ पुण्यात २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि राजस्थानी भाषांतील पाच नाटके या वेळी सादर होतील.

नसिरुद्दीन यांच्या नाटकाच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप होईल, अशी माहिती संयोजक सरयू दोशी आणि अशोक कुलकर्णी यांनी येथे दिली.
ही आहेत नाटके
- कसुमल सपनो – उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशन, जयपूर
- सी शार्प, सी ब्लंट – जर्मन – सोफिया स्टेफ
- अपराधी सुगंध – चंदनतस्करीचा विषय – किरण यज्ञोपवित
- कौमुदी – अभिषेक मुजुमदार
- इस्मत आपा के नाम – नसिरुद्दीन शहा.