आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nathuram Godse Film Releases As Freedom Of Expression

‘नथुराम गोडसे’ चित्रपट प्रदर्शित करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग, वकीलांचा हस्तक्षेप अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘देशभक्त नथुराम गोडसे’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रदर्शित करणार असल्याचे अखिल भारतीय हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी मुन्ना कुमार शर्मा यांनी जाहीर केले आहे, तर या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, याकरिता पुण्यातील दिवाणी न्यायालयात हेमंत पाटील या नागरिकाने याचिका दाखल केली आहे. मंगळवारी दिवाणी न्यायाधीश एच. आर. निमसे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी पुण्यातील लोकशाहीवादी वकिलांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून ‘सदर चित्रपट प्रदर्शित होणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे,’ असा युक्तिवाद केला आहे.

अॅड. असीम सरोदे, अॅड. विकास शिंदे, अॅड. प्रताप विटणकर, अॅड. अलका बबलादी, अॅड. सचिन गुप्ते यांच्यामार्फत हा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. अॅड. सरोदे म्हणाले, ‘देशभक्त नथुराम गोडसे या सिनेमावर बंदी आणू नये. प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करावे. अशा फुटकळ सिनेमांमुळे महात्मा गांधींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला कणभरही धोका होणार नाही’, असा दावा केला. तर ‘गांधी हे हिंदूविरोधी होते, असा आशय चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोणताही खोटा इतिहास जनतेसमोर येऊ नये, अशी आपली अपेक्षा आहे. आपणास स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली तरी मूलभूत हक्क समजून घेण्यास भारतीय नागरिकांना अपयश आले याचे हे उदाहरण आहे,’ असे मुन्ना शर्मा यांनी नमूद केले आहे.