आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nation Got Freedom But The Farmers And Citizens Of Baramati Have Been Enslaved By Pawar Family Modi

VIDEO: बारामतीतील लोक, शेतकरी अद्याप गुलामगिरीतच- मोदींचा पवारांवर हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- बारामतीच्या परिसरातील शेतकरी आजही काका-पुतण्याच्या गुलामगिरीत असून, त्यांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच आपण येथे आलो आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार फटकेबाजी केली. पवार काका-पुतण्यांनी सामान्यांची शेत, जमिन आणि स्वप्नं सगळं काही लुटले असल्याची जहरी टीकाही केली.
बारामतीतील सभेत मोदी काय-काय म्हणाले... वाचा...
- निवडणुकीचा कौल जाणण्यासाठी ही बारामतीची सभा पाहून घ्या
- 15 ऑक्टोबरचा दिवस बारामतीच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल
- 15 वर्षातील कुशासनाचा अंत करण्याची संधी
- पाणी मागण्यासाठी आलेल्यांसाठी अजित पवारांनी कसे शब्द वापरले
- अनेक गावांना आजही पिण्याचं पाणी मिळत नाही
- गुलामी किती काळ सहन करणार, काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून स्वतंत्र हवंय
- पाणी मागायला गेल्यावर काय उत्तर मिळतं
- शेत, जमीन, स्वप्न सगळी लुटली
- बारामतीमधील शेतक-यांना हक्कासाठी लढावे लागत आहे
- राष्ट्रवादीने धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला
- बारामतीतील 40 हून गावे पाण्यावाचून वंचित
- सरकारी अनुदानातील सहकारी साखर कारखाने तोट्यात अन् खासगी मालकीचे कारखाने नफ्यात कसे?
- बारामतीतील जनता अद्याप गुलामगिरीतच आहे.
- सैनिकांना निराश करणाऱ्या बाबींचा संदर्भ घेऊन राजकारण करुन नका
- सीमेवरच्या घटनांचा संदर्भ घेऊन राजकारण करणे चुकीचे
- शरद पवार तुम्ही संरक्षणमंत्री असताना चीनचा सामना करण्यासाठी तुम्ही कधी सीमेवर गेले का?
- मी गरीबी अनुभवली आहे, माझे सरकार अशाच सर्वसामान्यांसाठी
- ज्यांनी दहा वर्षात दहापटीने भ्रष्टाचार केला, त्यांना राजकारणात स्थान देऊ नका.
- शेतकऱ्यांची मतं मिळवली, पण आजवर कधी यांनी शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार केला नाही
- अमेरिकेत भारताचा जयजयकार होतोय, ही सर्व सव्वाशे कोटी भारतीयांची करामत
- महाराष्ट्राचा सर्वत्र जयजयकार व्हावा, यासाठी भाजपला बहुमत द्या.