आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्ध शाळा’ उपक्रम आता केंद्रीय पद्धतीने राज्यभरात नव्याने होणार शाळांचे मूल्यांकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शालेय स्तरावरील मूल्यांकनाचे सर्व निकष व निर्णय रद्द करून केंद्रीय पद्धतीने ‘समृद्ध शाळा’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ‘शाळा सिद्धी’अंतर्गत हे नवे मूल्यांकन होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याअंतर्गत राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या परिषद) शाळांचे नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे व संबंधित शाळांना तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
शासकीय शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसंदर्भात शाळांचे मूल्यांकन करण्याबाबत चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मूल्यांकनासाठी महाविद्यालयीन पातळीवर नॅक कमिटी काम करते. त्याप्रमाणे शालेय पातळीवर सॅक कमिटी स्थापन करण्याचा विचार शासनाने घेतला होता. तोच विचार पुढे नेत आता केंद्रीय पद्धतीने ‘समृद्ध शाळा’ असा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.
या उपक्रमासाठी वर्षाला २० हजार शाळांचे मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाला दिल्याची माहिती अाहे. हे मूल्यांकन राज्यातील सर्व शाळांसाठी लागू असून मूल्यांकन प्रमाणपत्र एसएस २०१६, २०१७ अशा पद्धतीने दिले जाईल.
मूल्यमापनाची पद्धत
येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
पाच वर्षांच्या आत शाळांना जेव्हा योग्य वाटेल, त्या काळात त्यांनी विद्या परिषदेकडून मूल्यांकन करून घ्यायचे आहे.
तत्पूर्वी मूल्यांकन करण्याविषयीचा अर्ज शाळेने विद्या परिषदेकडे द्यायचा आहे.
अर्ज प्राप्त झाल्यावर १ महिन्याच्या आत तपासणी करुन प्रमाणपत्र दिले जाईल.