आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅलिम्पिकसाठीच्या राेइंग बाेटीला ‘मेक इन इंडिया’ची प्रतीक्षा; राष्ट्रीय राेइंग स्पर्धा पुण्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सन २००० पासून अातापर्यंत भारताच्या दहा खेळाडूंनी राेइंग बाेटिंग स्पर्धेत अाॅलिम्पिक मध्ये पदक  मिळवले. त्यामुळे  सध्या तरुणाई राेइंग बाेटिंग खेळाकडे अाकर्षित झाली अाहे. मात्र, सदर खेळाच्या स्पर्धेकरिता व सरावासाठी अांतरराष्ट्रीय दर्जाच्या बाेटी देशात बनत नसल्याने दरवेळेस त्या परदेशातून अायात कराव्या लागत असून त्याकरिता माेठा निधी खर्ची करावा लागत अाहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर सिंगल सक्लस, डबल सक्लस, काॅक्सलेस पेअर, काॅक्सलेस फाेर अशा प्रकारच्या अांतरराष्ट्रीय दर्जाच्या राेइंग बाेटी भारतीय कंपन्यांनी बनवण्याची प्रतीक्षा खेळाडूंना असल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली अाहे. 

 
पुण्यातील काॅलेज अाॅफ मिलिट्री इंजिनिअरिंग (सीएमर्इ)च्या परिसरात अार्मी राेइंग नाेड या ठिकाणी ‘३६ वी राष्ट्रीय राेर्इंग चॅम्पियनशिप स्पर्धा’ दहा डिसेंबरदरम्यान अायाेजित करण्यात अाली अाहे. याकरिता देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील २४ संघ सहभागी झाले अाहेत. यामध्ये सुमारे ४२५ खेळाडूंचा सहभाग असून १२५ महिला खेळाडू अाहेत. या स्पर्धेतून पुढील वर्षी हाेणाऱ्या अाशियान स्पर्धा व त्यानंतरच्या अाॅलिम्पियन खेळाकरिता सर्वाेत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार अाहे. राेइंग फेडरेशन अाॅफ इंडियाच्या वतीने नुकतीच रुमानियातील परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली असून राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंची पाहणी ते करणार अाहेत तसेच या स्पर्धेकरिता अातापर्यंत राेइंग बाेटिंगमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त केलेले १४ नामांकित खेळाडूही उपस्थित राहणार अाहे. सन २०१२ मधील अाॅलिम्पिक विजेता सुभेदार स्वरण सिंग अाणि २०१६ चा विजेता हवालदार भाेकनाल दत्तू या दाेन अाॅलिम्पिक विजेत्यांमध्ये प्रथमच सिंगल सक्लस स्पर्धा हाेणार असून राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट्य अाहे.    


सध्याच्या मितीला इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या व्हिनटेच राेइंग कंपनीकडून मेड इन चीन ब्रँडच्या कार्बन फायबरपासून बनवलेल्या हलक्या वजनाच्या अांतरराष्ट्रीय दर्जाच्या बाेटी खरेदी केल्या जात अाहेत. पुण्यातील अार्मी राेइंग नाेड येथे खेळाडूंच्या सरावाकरिता तीन वर्षांत चार काेटीच्या ४३  बाेटींची खरेदी करण्यात अाली. देशात राेइंग बाेटी बनवणाऱ्या स्वस्तिक फायबर टेक अाणि सनी वाॅटर स्पाेर्ट््स या पुण्यातीलच दाेन नामांकित कंपन्या अाहेत.

 

३० काेटी रुपयांच्या राेइंग चॅनलची निर्मिती   
भारतात सर्वप्रथम  १८५८ मध्ये कोलकात्यातील हुगळी नदीत राेइंगला सुरुवात झाली व १८६७ मध्ये कलकत्ता व मद्रास क्लब यांच्यात राेइंग स्पर्धा हाेऊन कलकत्ता संघ विजयी झाला हाेता. १९७६ सालापासून अाॅलिम्पिकच्या राेइंग खेळात महिलांचा समावेश करण्यात अाला. भारतात राेइंगकरिता दाेन किलाेमीटरचा अांतरराष्ट्रीय दर्जाचा मानवनिर्मित एकमेव राेइंग चॅनल सीएमर्इत उभारण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...