आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Refill Congress Political Vacum Sharad Pawar\'s Anticipation

काँग्रेसची राजकीय पोकळी भरण्याची राष्ट्रवादीला संधी, शरद पवारांचा आशावाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - 'नथुरामाचे उदात्तीकरण, शिक्षणाचे भगवेकरण, इतिहासाचे पुनर्लेखन या माध्यमातून सुरू असलेले राजकारण, समाजकारण व धर्मकारण चिंताजनक आहे. ‘घरवापसी' सारख्या गोष्टी देशाच्या ऐक्याला सुरुंग लावणा-या आहेत. काळ सोपा उरलेला नाही,’ अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत भाजपला पर्याय असणारी काँग्रेस कमी पडत आहे. दिल्लीतूनही काँग्रेस हद्दपार होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या पराभवाने निर्माण होणारी राजकीय पोकळी भरून काढण्याची ऐतिहासिक संधी राष्ट्रवादीपुढे आहे, असे प्रतिपादन पवार यांनी केले.

राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाचा समारोप रविवारी झाला त्या वेळी ते बोलत होते. पवारांनी काँग्रेस, संघ, एमआयएम या सर्वांवर टीका केली; परंतु तासाभराच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही घेतले नाही.'महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. सगळीकडे हल्ले सुरू होते. जाळपोळ झाली. विशिष्ट वर्ग भेदरून गेला. त्यानंतर अनेक वर्षे गोडसेचे उदात्तीकरण करण्याचे धाडस कोणाचे झाले नव्हते. अलीकडच्या काळात मात्र त्याचे पुतळे, मंदिरे उभारण्याचे काम सुरू झालेय,’ असे पवार यांनी सांगितले. संघपरिवाराकडून इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचे गंभीर दुष्परिणाम भविष्यात पाहायला मिळतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.

घरवापसीतून ऐक्य कसे?
एका बाजूला विकासाचे ढोल वाजवायचे आणि दुस-या बाजूला घरवापसी. हा शब्द कधी ऐकला होता का आपण ? ख्रिश्चन, मुस्लिमांची घरवापसी हे सामाजिक ऐक्य ठेवणार आहे का? धर्माचे बंधन असे घालता येणार नाही. बराक ओबामा यांनीसुद्धा येथून गेल्यावर भारताने धर्मनिरपेक्षता सांभाळण्याची भूमिका बोलून दाखवली, असे पवार म्हणाले.

मर्यादित कुटुंब ठेवावे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले सूत्र आहे. सध्या सत्तेत असलेले लोक मात्र ४- ६ तर कधी १० अपत्यांची भाषा करतात. देशाला पाठीमागे घेऊन जाण्याचे काम या लोकांनी सुरू केल्याची टीका पवारांनी केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, शरद पवारांचे मार्गदर्शन...