पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग साखरपट्टा आहे. या साखरपट्ट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. विधानसभेच्या ५८ पैकी २१ जागा २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पारड्यात गेल्या होत्या. या वेळी भाजप -सेना युती आणि काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वर्चस्व कायम ठेवण्यासाठी
आपल्या सातारा आणि पुणे जिल्ह्यात झगडावे लागेल, असे चित्र समोर आले आहे.