आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुल्ला- मौलवींचे ऐकून मुस्लिम मत देत नाहीत - नवाब मलिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम बुखारी हे देशातील मुस्लिमांचे नेते नाहीत. मुल्ला, मौलवी, इमामांच्या सांगण्यावरून किंवा कोणी बाबा, ‘श्रीश्री’ यांच्या बोलण्यानुसार या देशात मतदान होत नाही,’ असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

‘सोनिया गांधी इमामांप्रमाणेच शंकराचार्य किंवा लिंगायत समाजाच्या गुरूंचीही भेट घेतात. यावरूनच त्या सेक्युलर असल्याचे स्पष्ट होते. मुस्लिम मते मिळवण्यासाठी भाजपनेही मदरशांच्या आधुनिकीकरणाचे आश्वासन दिले आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाने ही योजना पूर्वीच सुरू केली. त्य ावेळी मात्र मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा भाजपचा आरोप होता,’ असे मलिक म्हणाले.

राज ठाकरे गुजरातचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर
‘2009 च्या निवडणुकीत ईशान्य मुंबईची जागा मनसेने सर्वात कमी मताधिक्याने गमावली होती. तरीही या वेळी त्यांनी भाजपविरोधात उमेदवार दिला नाही. मनसेचे खासदार नरेंद्र मोदींनाच पाठिंबा देतील, असे सांगणारे राज ठाकरे गुजरातचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणूनच काम करतात. मनसे हा भाजपचा छुपा भिडू आहे,’ अशी टीका मलिक यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना कमकुवत झाल्याने भाजपला त्यांची साथ नकोशी झालीय. मात्र, राज यांच्या मैत्रीचा फटका यूपी, बिहारमध्ये बसेल, या भीतीमुळे ते एकत्र आलेले नसल्याचे मलिक यांनी सांगितले.