आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxalites Travelling To Terrorism, Home Minister Sushilkumar Shinde Remark

नक्षलवाद्यांची दहशतवादाच्या दिशेने वाटचाल, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे नक्षलवादी आता दहशतवादाच्या दिशेने वाटचाल करत असून ते आदिवासींना मारत आहे. त्यांचा कोणत्याही यंत्रणेवर विश्वास नसून ते मानवतेलाही मानत नाहीत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा समर्थपणे मुकाबला करावा लागेल, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केले.


केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) व सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स (केंरिपोबल) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे सैनिकांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संयुक्त रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय गृह सचिव अनिल गोस्वामी, खासदार गजानन बाबर, सीआरपीएफ महासंचालक प्रणय सहाय, अतिरिक्त महासंचालक अरुणा बहुगुणा, पोलिस महानिरीक्षक प्रदीप कुमार उपस्थित होते.


शिंदे म्हणाले, छत्तीसगड येथील विजापूर या नक्षलग्रस्त भागात सीआरपीएफचे सैनिक आतपर्यंत घुसवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नक्षलवाद चळवळ संपुष्टात आणण्यासाठी गृह विभागाची प्राथमिकता असेल. दहशतवादविरोधी अभियान व दुर्गम क्षेत्रात गंभीर जखमी झालेल्या सैनिकांना या रुग्णालयात अत्याधुनिक उपचार मिळतील. जखमी सैनिकांच्या वेतन भत्त्यात कोणतीही कपात यापुढील काळात केली जाणार नाही तशा प्रकारचे आदेश पारित करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले


बुद्धगया स्फोटात प्रगती
बिहार येथील बुद्धगया मंदिरात अतिरेक्यांनी एकूण 13 बॉम्ब ठेवले होते. त्यापैकी दहा बॉम्बचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. त्यानंतर तातडीने राष्‍ट्रीय संरक्षण यंत्रणा (एनएसजी) व राष्‍ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ची पथके पाठवण्यात आली. पथकांना तपासात महत्त्वपूर्ण बाबी आढळून आल्या असून तपास प्रगतीच्या दिशेने सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.