आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naxals Release Three Pune Youths Reached In Pune, Parents Welcome Him

नक्षल्यांच्या तावडीतून सुटलेली पुण्यातील तीन मुले कुटुंबीयांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे पोलिस आयुक्तालयात तीनही तरूणांना पोलिस घेऊन येताना... - Divya Marathi
पुणे पोलिस आयुक्तालयात तीनही तरूणांना पोलिस घेऊन येताना...
पुणे- छत्तीसगडमध्ये सशस्त्र नक्षलवाद्यांनी अपहरण केलेले पुण्यातील आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाळे यांची सुटका झाल्यानंतर त्यांना बुधवारी पुणे पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सदर मुलांची अडीच ते तीन तास चौकशी केली त्यानंतर त्यांना कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आले.
भारत जोडो अभियान अंतर्गत ही मुले महाराष्ट्र-छत्तीसगड-ओडिशा या राज्यातील भामरागड-दंतेवाडा-मलखनगिरी या नक्षलग्रस्त भागात सायकल यात्रेकरिता पुण्यावरून रवाना झाली होती. तीन डिसेंबर रोजी नागपूरहून ही मुले भामरागड येथे फिरून छत्तीसगडमधील बेगुडला 29 डिसेंबर रोजी पोहोचली होती. मात्र, पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्याबाबत खातरजमा करून घेतल्यानंतर 96 तासांनी त्यांची सुटका करण्यात आली होती.
याबाबत पुणे पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले की, 'नक्षलवाद्यांच्या तावडीतुन सुटका करण्यात आलेल्या मुलांकडे आम्ही चौकशी केली आहे. मात्र, कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचलेलो नाही. आत्ताच याबाबत कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नसुन त्याबाबत स्पष्टाता हळुहळु होर्इल. सदर मुलांना त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ही तीनही तरूण मूळचे साता-याचे आहेत. शिक्षणानिमित्त ते पुण्यात वास्तव्यास आहेत.