आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM आणि CM च्या प्रतिमेला शिवला कावळा; महागाई विरोधात राष्ट्रवादीने सत्ताधार्‍यांचे घातले श्राद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वाढत्या महागाई विरोधात आणि पेट्रोल दरवाढ विरोधात आज (शुक्रवारी) पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आगळा-वेगळा पद्धतीने सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला. केंद्र आणि राज्य सरकारचे श्राद्ध करण्‍यात आले. विशेष म्हणजे पितृपंधरवाड्याच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडवणीस यांच्या प्रतिमेसमोर कावळा ठेवण्यात आला.

देशात पेट्रोल दरवाढ दिवसेंदिवस बदलत असल्यामुळे सर्वत्र भाजप सरकारचा निषेध केला जातोय. पेट्रोल , गॅस, डिझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू महागल्या असून नागरीक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचजवड शहरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून श्राद्ध घालण्यात आले. पितृपक्ष सुरू असल्यामुळे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडवणीस यांचे श्राद्ध घालून कावळा शिवण्यात आला . राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात 61 रुपये असणार पेट्रोल आज मोदी सरकारच्या काळात 80 रुपयांवर गेले आहे. डिझेल 60 रुपयांवर , तर जीवनावश्यक वस्तू देखील महागल्या आहेत. ही महागाई लवकरात लवकर कमी व्हावी आणि जनतेचा त्रास यातून कमी व्हावा यासाठी राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली. त्याच बरोबर महागाई आटोक्यात आणण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा देखील वाघेरे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, सोशल मीडियावर देखील नरेंद्र मोदी , स्मृती इराणी आणि भाजप सरकार ने 2014 मध्ये पेट्रोल दरवाढ विरोधात केलेल्या भाषणांचे विडिओ व्हायरल होत आहे. त्याच्यावर तिव्र शब्दात टीका होत आहेत. पेट्रोल संदर्भात झालेल्या दरवाढी विरोधात चौबाजूने भाजप सरकारचा निषेध केला जातोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरवाढीला आळा कधी बसणार असा प्रश्न संतप्त नागरीक विचारत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित बातमीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...